लाडकी बहीण योजना बंद होणार का? मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले स्पष्ट..


WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

Ladki Bahin Yojana Update: महाराष्ट्र सरकारने मुख्यमंत्री माझी लाडकी बहिणी योजना सुरू केली आहे. ही योजना संपूर्ण महाराष्ट्रात सुप्रसिद्ध ठरली आहे. या योजनेअंतर्गत महिलांना 1500 रुपये दरमहा दिले जातात. विधानसभा निवडणुका झाल्यानंतर लाडकी बहीण योजना बंद होणार अशा चर्चा सोशल मीडियावर सुरू होत्या. त्याचबरोबर विरोधी पक्षातील नेत्यांनी देखील लाडकी बहीण योजना बंद होणार असल्याचे आरोप केले होते. आता यात आरोपावर प्रतिउत्तर देत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मोठे वक्तव्य केले आहे.

या महिलांचे अर्ज होणार बाद;

अपात्र महिलांची यादी पाहण्यासाठी येथे क्लिक करा

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले की, महायुती सरकारने सुरू केलेल्या महिला आणि दलितांसाठी सर्व योजना यापुढेही सुरू राहणार आहेत. आमच्या जाहीरनाम्यात दिलेली सर्व आश्वासने आम्ही पूर्ण करणार आहोत. याबाबत मंत्रिमंडळाच्या बैठकीत आम्ही चर्चा देखील केली आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी प्रसार माध्यमांशी बोलताना स्पष्ट सांगितले की, आम्ही सुरू केलेली लाडकी बहीण योजना आणि इतर योजना बंद होणार असल्याच्या अफवा आहेत. आमच्या सरकारने सुरू केलेल्या महिला आणि दलित लोकांच्या हितासाठी सुरू केलेल्या सर्व योजना चालूच राहणार आहेत. त्याचबरोबर आम्ही आमच्या जाहीरनाम्यात दिलेली सर्व आश्वासने देखील पूर्ण करणार आहोत असे त्यांनी यावेळी म्हटले आहे.

सोशल मीडियावर लाडके बहिण योजना बंद होणार असल्याच्या चर्चांना उधाण आले होते. मात्र ये अफवा खोटे असल्याचे आता मुख्यमंत्र्यांनी सांगितले आहे. याआधी महिला व बालकल्याण मंत्री अदिती तटकरे यांनी देखील याबाबत स्पष्टीकरण दिले होते. त्यानंतर आता देवेंद्र फडणवीस यांनी देखील ही योजना सुरूच राहणार असल्याचे सांगितले आहे. त्यामुळे लाडक्या बहिणींना मोठा दिलासा मिळाला आहे. Ladki Bahin Yojana Update

घरी बसण्यापेक्षा हा मस्त बिजनेस सुरू करा; दर महिना 80 हजार रुपये नफा मिळेल

दरम्यान लाडकी बहीण योजनेत आता महिलांच्या अर्जाची पडताळणी सुरू आहे. या योजनेत अपात्र असलेल्या महिलांचे अर्ज बाद केले जाणार असल्याचे सांगितले जात आहे. या योजनेअंतर्गत ज्या महिला निकषाचे पालन करत नाहीत. म्हणजे या योजनेत ज्या महिलांच्या कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न अडीच लाखापेक्षा जास्त आहे, ज्या महिलांच्या घरातील कोणाकडेही चार चाकी वाहन आहे, त्या महिलांना यापुढे लाभ मिळणार नाही. सरकारी नोकरी आणि आयकर रिटर्न भरणाऱ्या कुटुंबातील महिलांना देखील या योजनेचा लाभ मिळणार नाही.

अशाच नवनवीन माहितीसाठी आमच्या व्हाट्सअप ग्रुपला जॉईन करा

Leave a Comment