एलपीजी गॅस सिलेंडर झाले स्वस्त; जाणून घ्या तुमच्या शहरात किती आहे किंमत?


WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

LPG Gas Cylinder Price Today: केंद्रीय अर्थसंकल्प एक फेब्रुवारी रोजी अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी सादर केला आहे. दरम्यान फेब्रुवारी महिन्याच्या पहिल्याच दिवशी सर्वसामान्यांना मोठा दिलासा मिळाला आहे. एक फेब्रुवारी रोजी व्यावसायिक एलपीजी गॅस सिलेंडरच्या किमतीत सात रुपयाची घसरण झाली आहे. तुम्हाला तर माहीतच असेल प्रत्येक महिन्याच्या पहिल्या दिवशी एलपीजी गॅस सिलेंडरच्या किमतीत बदल होत असतो. या महिन्याच्या पहिल्या दिवशी केंद्रीय अर्थसंकल्प देखील सादर झाला आहे. दरम्यान व्यावसायिक गॅस सिलेंडरच्या किमतीत घसरण झाले आहे मात्र घरगुती गॅस सिलेंडरच्या किमतीत कोणताही बदल झालेला नाही.

👇👇👇👇

शरणानुसार एलपीजी गॅस सिलेंडरचे दर जाणून घेण्यासाठी येथे क्लिक करा

देशातील प्रमुख शहरांमध्ये गॅस सिलेंडरची किंमत

एक फेब्रुवारी पासून नवीन एलपीजी गॅस सिलेंडर दर लागू झाले आहेत. दिल्लीमध्ये व्यावसायिक एलपीजी गॅस सिलेंडरची किंमत सात रुपयांनी स्वस्त होऊन 1797 रुपये एवढी झाली आहे. त्याचबरोबर कोलकत्ता या शहरांमध्ये एलपीजी गॅस सिलेंडरची किंमत 1907 रुपये एवढी आहे. मुंबई शहरामध्ये 1749.50 रुपये एवढी झाली आहे. त्याचबरोबर चेन्नईमध्ये व्यावसायिक एलपीजी गॅस सिलेंडरची किंमत 1959.50 रुपये झाली आहे.

👇👇👇👇

शरणानुसार एलपीजी गॅस सिलेंडरचे दर जाणून घेण्यासाठी येथे क्लिक करा

घरगुती गॅस सिलेंडरची किंमत

फेब्रुवारी महिन्यात घरगुती गॅस सिलेंडरच्या किमतीत कोणताही बदल झालेला नाही. मागील महिन्याप्रमाणेच याही महिन्यात एलपीजी गॅस सिलेंडरचे दर राहणार आहेत. 14.2 किलोच्या घरगुती एलपीजी गॅस सिलेंडरची किंमत सध्या दिल्लीमध्ये 803 रुपये एवढी आहे. कोलकत्ता मध्ये 829 रुपये, मुंबईमध्ये 802.50 रुपये आणि चेन्नई शहरांमध्ये 818.50 रुपये एवढी आहे. LPG Gas Cylinder Price Today

👇👇👇👇

शरणानुसार एलपीजी गॅस सिलेंडरचे दर जाणून घेण्यासाठी येथे क्लिक करा

मागील वर्षी एलपीजी गॅस सिलेंडरची किंमत किती होती?

2024 मध्ये एलपीजी गॅस सिलेंडरची किंमत किती होती हे पाहिल्यानंतर दिल्लीतील व्यावसायिक गॅस सिलेंडरची किंमत 1769.50 रुपये एवढी होती. तर 2023 मध्ये व्यावसायिक गॅस सिलेंडरची किंमत 1769 रुपये एवढी होती. 2022 मध्ये एलपीजी गॅस सिलेंडरची किंमत मोठ्या प्रमाणात घसरली होती. तेव्हा एलपीजी गॅस सिलेंडरची किंमत 1998.50 वरून 1907 रुपयावर आली होती.

👇👇👇👇

शरणानुसार एलपीजी गॅस सिलेंडरचे दर जाणून घेण्यासाठी येथे क्लिक करा

भविष्यात एलपीजी गॅस सिलेंडरच्या किमती कशा राहणार?

भविष्यात एलपीजी गॅस सिलेंडरच्या किमती आणखीन कमी होणार अशी शक्यता वर्तवली जात आहे. गेल्या काही महिन्यांपासून व्यवसयिक सिलेंडरच्या किमती सातत्याने घटत आहेत. सबसिडी वाढवली गेल्यास घरगुती सिलेंडरचे दरही स्वस्त होण्याची शक्यता आहे. त्यामुळे 2025 च्या अर्थसंकल्पानंतर सरकार कोणत्या निर्णय घेणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

अशाच नवनवीन माहितीसाठी आमच्या व्हाट्सअप ग्रुप ला जॉईन करा

1 thought on “एलपीजी गॅस सिलेंडर झाले स्वस्त; जाणून घ्या तुमच्या शहरात किती आहे किंमत?”

Leave a Comment