लाडकी बहीण योजनेचा फेब्रुवारी महिन्याचा हप्ता कधी मिळणार? आली महत्त्वाची माहिती समोर..


WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

Ladki Bahin Yojana Installment: महाराष्ट्र सरकारचे मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना सर्वत्र सुप्रसिद्ध ठरली आहे. ही योजना सुरू झाल्यापासून राज्यातील लाखो महिलांना आर्थिक मदतीचा मोठा दिलासा मिळाला आहे. या योजनेअंतर्गत पात्र महिलांना दरमहा 1500 रुपयाची आर्थिक मदत दिली जाते. या योजनेअंतर्गत जानेवारी महिन्याचा हप्ता काही दिवसापूर्वी महिलांच्या खात्यात जमा झाला आहे. यानंतर आता फेब्रुवारी महिन्याच्या हप्त्याची वाट सर्व महिला पाहत आहेत. हा हप्ता नेमकं कधी मिळणार आणि महिलांना 1500 रुपये मिळणार का 2100 रुपये याबाबत मोठी उत्सुकता लागली आहे.

👇👇👇👇

लाडकी बहीण योजनेसाठी फेब्रुवारी महिन्यातील पात्र महिलांची यादी पाहण्यासाठी येथे क्लिक करा

फेब्रुवारी महिन्याचा हप्ता कधी मिळणार?

लाडकी बहीण योजनेच्या फेब्रुवारी हत्याबाबत अधिकृत तारीख जाहीर झालेली नाही. मात्र या महिन्याच्या शेवटच्या दोन आठवड्यामध्ये कोणत्याही दिवशी हा हप्ता लाभार्थी महिलांच्या खात्यात जमा होण्याची शक्यता आहे. फेब्रुवारी महिना हा 28 दिवसाचा असल्यामुळे या योजनेअंतर्गत पुढील हप्ता वीस तारखेपर्यंत महिलांच्या खात्यात जमा होऊ शकतो. अशी माहिती प्रशासनातील काही सूत्रांकडून मिळाली आहे.

लाडकी बहीण योजनेअंतर्गत मागील तीन महिन्याचे पैसे महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात जमा केले जात आहेत. यानुसार फेब्रुवारी महिन्याचा हप्ता देखील 25 ते 28 फेब्रुवारी दरम्यान महिलांच्या खात्यात जमा होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. मात्र यासंदर्भात अजून कोणतीही अधिकृत घोषणा झालेली नाही. Ladki Bahin Yojana Installment

हे पण वाचा

नवरदेवाने स्वतःच्याच लग्नात केला “चोली के पीछे क्या है” गाण्यावर असा डान्स; पाहून मुलीच्या वडिलांनी मोडलं लग्न

फेब्रुवारी महिन्यात महिलांच्या खात्यावरती 1500 रुपये मिळणार का 2100 रुपये मिळणार?

राज्यातील विधानसभा निवडणुकीच्या प्रचारादरम्यान तत्कालीन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी या योजनेच्या मदतीच्या रकमेत वाढ करून 2100 रुपये करण्याचे आश्वासन दिले होते. मात्र हे आश्वासन अजून प्रत्यक्षात लागू केले नाही. वाढीव रकमेबाबत येणाऱ्या अर्थसंकल्पात निर्णय घेणार असल्याची माहिती प्रसारमाध्यमांमध्ये दरवळत आहे. ही योजना सुरू झाल्यापासून लाखो महिलांनी या योजनेअंतर्गत लाभ घेतला आहे. मात्र दरम्यान सरकारकडून लाभार्थ्यांची नावे पडताळणी प्रक्रिया सुरू करण्यात आले आहे. त्यामुळे लाडकी बहिणीसाठी पुढील महिन्यात काही महत्त्वाचे बदल होण्याची शक्यता आहे.

हे पण वाचा

RBI कडून सर्वसामान्यांना मोठे गिफ्ट! या नागरिकांचा होणार मोठा फायदा..

अनेक महिलांचे अर्ज रद्द

लाडकी बहीण योजनेचा लाभ घेण्यासाठी अनेक महिलांनी अर्ज केले होते. मात्र योजनेच्या नियमानुसार काही महिलांना अपात्र ठरवण्यात आले असून त्यांच्या अर्ज रद्द करण्यात आले आहेत. काही दिवसापूर्वी अपात्र महिलांकडून पैसे परत घेतले जाणार अशी चर्चा प्रसार माध्यमांमध्ये होत होती. यामुळे अनेक महिलांनी स्वतःहून अर्ज माघारी घेतली आहेत.

राज्याच्या महिला व बालकल्याण मंत्री अदिती तटकरे यांनी अपात्र महिलांनी आपले अर्ज माघारी घ्यावे अशा आव्हान केले होते. त्यानंतर हजारो महिलांनी स्वतःहून आपले अर्ज माघारी घेतले आहे. सध्या लाडकी बहीण योजनेतील पात्र लाभार्थ्यांची पडताळणी सुरू असून या योजनेत ज्या महिला निकशाचे पालन करत नाहीत त्या महिला अपात्र ठरवण्यात येणार आहेत. मात्र अपात्र महिलांकडून लाभाची रक्कम वापस घेतली जाणार का हे पाहण्यासारखे राहणार आहे.

अशाच नवनवीन माहितीसाठी आमच्या व्हाट्सअप ग्रुपला जॉईन करा

Leave a Comment