१ फेब्रुवारीपासून सोनं होणार महाग; सरकार सोन्याबाबत घेणार मोठा निर्णय?


WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

Budget Gold Price News: तुम्ही देखील सोने खरेदीचा विचार करत असाल तर ही बातमी तुमच्यासाठी खूप महत्त्वाची आहे. कारण केंद्रीय अर्थमंत्री निरमाला सितारामन येथे एक फेब्रुवारीला केंद्रीय अर्थसंकल्प सादर करणार आहेत. या अर्थसंकल्पाकडे सर्व जनतेचे लक्ष लागले आहे. अर्थसंकल्प सादर करण्यासाठी अवघे काही दिवस शिल्लक राहिले आहेत. या अर्थसंकल्पामध्ये कोणता निर्णय होणार आणि त्या निर्णयामुळे काय स्वस्त होणार व काय मागवणार हे जाणून घेण्यासाठी सर्वजण उत्सुक आहेत. अर्थसंकल्पांमध्ये सोन्याच्या किमतीवरील करा बद्दल मोठी निर्णय होण्याची शक्यता आहे. बजेटमध्ये सरकार सोन्यावरील कस्टम ड्युटी वाढवू शकते. ज्यामुळे सोन्याचे दर आणखीन वाढण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

👇👇👇👇

आजचे सोन्याचे दर जाणून घेण्यासाठी येथे क्लिक करा

केंद्रीय अर्थसंकल्प अधिवेशन 31 जानेवारीपासून सुरू होणार आहे. हे अधिवेशन 4 एप्रिल पर्यंत चालणार आहे असे देखील सांगितले जात आहे. अर्थमंत्री निर्मला सीतारामन एक फब्रुवारीला म्हणजेच शनिवारी अर्थसंकल्प सादर करणार आहेत. या अर्थसंकल्पामध्ये सरकार सोन्याबाबत मोठा निर्णय घेऊ शकते. सरकार सोन्यावरील आयात शुल्क म्हणजेच कस्टम ड्युटी वाढवण्याच्या तयारीत आहे असे सांगितले जात आहे. जर एक फेब्रुवारीला सादर होणारे अर्थसंकल्पात सोन्यावरील कस्टम ड्युटी वाढवण्याची घोषणा केली तर सोन्याच्या भावात बदल होऊन सोन्याचे दर वाढण्याची शक्यता देखील वाढत आहे. Budget Gold Price News

👇👇👇👇

आजचे सोन्याचे दर जाणून घेण्यासाठी येथे क्लिक करा

मागील वर्षी जुलै 2024 मध्ये सादर झालेल्या केंद्रीय अर्थसंकल्पात निर्मला सीतारामन यांनी सोने आणि चांदीवरील आया शुल्क 15 टक्क्यावरून सहा टक्के केले होते. ज्यामुळे सोन्याची किमती स्वस्त झाल्या होत्या. आयात शुल्क नऊ टक्के कपाची आयात शुल्कातील आतापर्यंतची सर्वात मोठी कपात होती. 2013 नंतर पहिल्यांदाच आयात शुल्क दहा टक्के पेक्षा खाली आली होती. त्यामुळे सोन्याचे दर मोठ्या प्रमाणात घसरलेले आपण पाहिले होते. त्याचप्रमाणे या अर्थसंकल्पात कस्टम ड्युटी वाढवण्याचा निर्णय सरकार देऊ शकते अशी शक्यता वर्तवली जात आहे. हा निर्णय झाला तर सोन्याचे दर गगनाला भिडू शकतात.

अशाच नवनवीन माहितीसाठी आमच्या व्हाट्सअप ग्रुप ला जॉईन करा

Leave a Comment